“माणसातच परमेश्वर शोधावा”; मा. चंद्रकांतदादा पाटील
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
“माणसातच परमेश्वर शोधावा”; मा. चंद्रकांतदादा पाटील
गुणी शिक्षकवृंदाचा गौरव सोहळा
सेवा पंधरवाड्यातील अभिनव उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे-दि.7 (प्रतिनिधी) माणसातच परमेश्वर शोधावा, असे मूल्य शिक्षण देणा-या माझ्या सर्व शिक्षकांनी दिलेले संस्कार आजही मला उपयोगी पडत आहेत. कारण शाळेतच ख-या अर्थाने मुलांची जडण घडण होत असते, म्हणून शिक्षक रूपी गुरूंचे मार्गदर्शन हे जीवनात मोलाचे असते. अशा गुरूजनांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. आजच्या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना मी नमन करतो” अशी भावना मंत्रीमहोदय, मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. शिक्षक गौरव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय परंपरेत पूजनीय गुरुजनांचा सन्मान करणे, ही फार पवित्र गोष्ट मानली जाते. याच भावनेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त साजरा करण्यात येणा-या सेवा पंधरावडा कालावधीचे औचित्य साधून हृद्य असा हा ‘शिक्षक गौरव सोहळा’ गोखलेनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या भागातील विविध प्रशालामध्ये गेली अनेक वर्ष आध्यापनाचे काम निष्ठेने करणा-या गुणी शिक्षकवृंदाचा या कार्यक्रमात कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेश बाचल यांनी या कृतज्ञता सोहळ्याचे संयोजन केले होते. कोजागरी पौर्णिमेच्या शारदीय मुहूर्तावर किलबिल हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहाने साज-या झालेल्या या कार्यक्रमास किलबिल विद्यालयाचे प्राचार्य रफिक सौदागर , तसेच भाजपचे सरचिटणीस रवी साळेगावकर आणि पुनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविका करताना योगेश बाचल यांनी या कार्यक्रम संयोजनाबद्दल आपली भूमिका मांडली. मनोगत व्यक्त करताना मा. चंद्रकांत दादा यांनी गिरणगावच्या नगर पालिका शाळेतील काही आठवणी सांगून लहानपणी शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. सर्व सत्कारार्थी शिक्षक वृंद, त्यांचे कुटूंबिय, विद्यार्थी व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.



