0
1
9
8
8
5
भावना जपू या
दुखवू ना कुणाचे मन
करू संकल्प आज दिनी
भावना जपू या निष्कलंक
मानवता जपू या जीवनी
एकमेका साह्य करूनी
आचरू विकासाचा मार्ग
होवो जगी सर्वांचे भले
सद्धर्माने होई ईथे स्वर्ग
नको बोलणे कठोर वाणी
नको हिंसा,नको दुरावा
प्रेम द्यावे भरभरूनी
शुद्ध भावना असो पुरावा
उच्च निच ना कुणी इथे
परमेश्वराची सर्व लेकुरे
असो वागणे समानतेचे
जपुनी भावना प्रेम अंकुरे
नातेगोते,समाजबांधव
जपू भावना आत्मियतेने
स्नेह वाढो परस्पराशी
नाते जपू या आपुलकीने
श्रीमती सुलोचना लडवे
जि.अमरावती
=======
0
1
9
8
8
5