0
1
9
9
5
3
सूर तुझे माझे
सुरांची मैफिल
सुमनांची पखरण!!
सूर तुझे माझे जुळता
नंदनवन होईल जीवन!!!
नजरेस नजर मिळता
घायाळ झालो मी!!
सूर तुझे माझे जुळता
शैशवात बहरलो मी!!!
कोकिळेसम तुझी मंजुळ वाणी
मी विणेचा पुजारी!!
सूर तुझे माझे जुळता
सफल होईल प्रेमकहाणी!!!
छेडता तू तार मनाची
माझे न मी राहिले!!
सूर तुझे माझे
भावसागरी गुंजले!!!
बी.आर.पतंगे
जि.अहिल्यानगर
0
1
9
9
5
3