‘आभाराची शब्दफुले’; प्रतिमा नंदेश्वर
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
‘आभाराची शब्दफुले’; प्रतिमा नंदेश्वर
आनंद सरीत भिजवणारा आज सकाळीच आ. राहुल सरांचा मॅसेज होता. “तुमचा फोटो पाठवा”. बघताच मी लगेच फोटो पाठवला. थोड्या वेळाने ग्रुप बघितले माझ्या छायाचित्रातील सर्वोत्कृष्ट पोस्टर ‘बालकाव्य’ समूहात झळकले, बघून अंतर्मन हिरवगार झालं. माझा आनंद व्दिगुणीत झाला. मुख्य परीक्षक टीमचे मनस्वी खुप खुप आभार मराठीचे शिलेदार समूहाच्या सदैव ऋणाईत.
काल बालकाव्य रचनेसाठी आ. राहुल सरांनी ‘ओढ्याची ओढ’ हा मनाला चैतन्य निर्माण करणारा रम्य असा विषय दिला होता. विषय बघताच क्षणी रचना लिहाव असे मन झाले. आणि लिहिले पण. ओढ्याची बाल मनालाच काय मोठ्यानाही ओढ लागते. ओढा बघताच मन कस प्रसन्न होतं. खडकातून वाहणारे निर्मळ ते पाणी, दुतर्फा हिरवीगार दाट झाडी, नाजूक रोपटी, रंगीबेरंगी फुले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, प्राणी ओढ्याच्या पाण्याने फुललेले हिरवगार शेत, पाखरांचा किलबिलाट ते पांढरेशुभ्र बगळे आहाहा.!
काय निसर्ग नजारा किती रम्य भासतो हा ओढा. किती किती वर्णन करावे तेवढे कमीच. मामाचं गाव आणि तेथील आठवणीतील ओढा आठवला नि मन बालपणात गेले. आणि लगेच मी रचना केली. मुख्य परीक्षकास माझी बाल रचना भावली योग्य न्याय देत रचनेला सर्वोत्कृष्ट सन्मान दिला. मला गौरवण्यात आले. त्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे स्पर्धा आयोजक आधारवड, कल्पवृक्ष, देवांश, कवी,आदर्श शिक्षक, लेखक, समिक्षक आ राहुल सर समूहाच्या प्रशासक मुख्य परीक्षक आ.सविताताई, आ. वैशालीताई, आ. स्वातीताई, आ सुधाताई, तारकाताई, आ. वृंदाताई, आ शर्मिलाताई, आ. विष्णू दादा आ. संग्राम दादा आ. हंसराज दादा. आ. लाडगे दादा, उरकुडे सर सर्व प्रशासकीय टिमचे हृदयस्थ आभार. माझ्यावर शब्दसुमने उधळीत अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक धन्यवाद व आभार.
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह