कविताकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध
प्रवास उटी-म्हैसूरचा; प्रांजली जोशी
0
4
8
2
9
7
प्रवास उटी-म्हैसूरचा
म्हैसूरच्या पॅलेसला, ऐतिहासिक मान
विविध प्राणी-पक्ष्यांना, प्राणीसंग्रहालयात स्थान
राजासीटचा परिसर, रंगीबेरंगी फुलांचा
मंदिर,बौद्ध स्तूप, नक्षीदार कलेचा
वृंदावनच्या कारंज्या, नयनरम्य दिसे
परिसर सभोवतालचा, हिरवा गालिचा भासे
चॉकलेट फॅक्टरीची, किमयाच न्यारी
आस्वाद प्रत्येकाचा, असे लय भारी
मनमोहक फुले, गुलाबांचा नजारा
पाहुनी फुलला, मनमोराचा पिसारा
धार्मिक व श्रद्धाळू, लोक असती इथे
रूढी परंपरेला आपल्या, जिवापाड जपे
लालबागचा परिसर पाहून, हरपले भान
म्हैसूरचा वाघ, प्रसिद्ध टिपू सुलतान
प्रांजली जोशी
विरार, पालघर
0
4
8
2
9
7



