Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध

रंगभूमी

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव, जि.रायगड

0 5 2 4 6 6

रंगभूमी..

जीवनाची रंगभूमी
हरएक जण कलाकार
भावनांचा असा पडदा
स्वतःच बनतो शिल्पकार..

जो या रंगभूमीवर उतरतो
चढवून एक मुखवटा
साकारतो कितीतरी व्यक्तीचित्र
आनंद-दुःखाच्या मूक छटा..

कधी खरं, कधी खोटं
बदलतात किती हावभाव
समोरचा शोधत राहतो ठाव
असा पडतो त्याचा प्रभाव..

रंगभूमी तीच राहते
बदलत जातात पात्र
भूमिकाही बदलतात
मनी आठवणींचं पात्र..

रंगभूमीच ती शेवटी
होतोच पडदा बंद
कहाणीचा होतो अंत
पण वठवण्याचा तो छंद..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव, जि.रायगड
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे