Breaking
अमरावतीई-पेपरविदर्भसाहित्यगंध

सोन्याचे पुस्तक

श्रीमती सुलोचना लडवे अमरावती

0 6 6 7 4 6

सोन्याचे पुस्तक

शेतातून संध्याकाळी परत घरी येताना कौसल्याबाईला केव्हा घरी जातो असे झाले होते. घरी परतताच त्यांनी हातपाय वगैरे धुवून चहा घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागल्या. रोज थोडा आराम करून त्या नंतर स्वयंपाक करायच्या. लगेच त्यांनी मुलांना जेवू घातले. यजमानांना ताट वाढले व स्वतःही जेवण करून घेतले. त्यांची ही घाई पाहून यजमानांनी विचारले, ‘आज काय हाय गडया, सारे कामं आज पटापट उरकले’. कौसल्याबाईने उत्तर दिले,’अव तुमास्नी मायीत नाई काय?आज वयस्कर न शिकलेल्या लोकासाठी रातीची शाळा हाय.हे शाळा रोजच रायीन.त्यातून मले बी शिकता यीन तं लय चांगल हुईन’.

कौसल्याबाईला शिक्षणाची खूप आवड होती.त्या केव्हाही भेटल्या की त्यांना शिक्षण नसल्यामुळे वाचता लिहीता येत नाही याची खंत बोलून दाखवायच्या.आज तो योग आला होता.त्यामुळे त्या खुप खुशीत होत्या.सर्व आटोपून त्या रात्रीच्या शाळेत गेल्या.शाळेतील शिक्षकच रात्रीचा वर्ग घेणार होते.जेमतेम चार पाच निरक्षर शाळेत हजर होते.गुरूजींनी प्रथम प्रार्थना घेतली.कौसल्याबाईचा आवाज गोड.अतिशय तनमनाने त्या प्रार्थनेत रंगून गेल्या.नंतर गुरूजींनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.शासनाकडून मिळालेली अक्षरधारा भाग १ ही पुस्तके गुरूजींनी सर्वांना दिली.पाट्या व लेखनचे वाटप झाले.कौसल्याबाईचा ऊर आनंदाने भरून आला.गुरूजींनी फळ्यावर ‘अ’ हे अक्षर लिहीले. प्रौढ निरक्षरांकडून वाचून घेतले.नंतर तेच अक्षर पाटीवर गिरवून घेतले.आज शिक्षण शिकण्याचा श्रीगणेशा झाला होता.

हळूहळू सर्व अक्षरे,त्यांची बाराखडी,अंकवाचन टप्प्यटप्प्याने सर्व घेण्यात आले.अक्षरे जोडून शब्द तयार होऊ लागले.शब्द जोडून वाक्यवाचन होऊ लागले.या सर्वात मन लावून अभ्यास करणा-या कौसल्याबाई भराभर सर्व शिकल्या.घरी येणारे पत्र त्या वाचू लागल्या.अक्षरधारा भाग १ ची परीक्षा झाली.त्यात कौसल्याबाईचा प्रथम क्रमांक आला.गावातील सर्व निरक्षर रात्रीच्या शाळेत येऊ लागले.शेतात काम करताना आपापसात पुस्तकातील वाक्यांचे चिंतन होऊ लागले.

पुढे अक्षरधारा भाग२ व अक्षरधारा भाग३ यातील सर्व धडे वाचून आणि लिहून झाले.एक दिवस अचानक शिक्षणाधिकारी साहेब वर्गाला भेट द्यायला आले.साक्षर झालेल्या सर्वांशी त्यांनी संवाद साधला.काही धडे वाचून घेतले. काही संख्या वाचून घेतल्या. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारांची उदाहरणे सोडवून घेतली. साक्षर झालेल्या प्रौढांना त्यांनी आपले मत मांडायला सांगीतले,तेव्हा कौसल्याबाई उभ्या राहिल्या व बोलू लागल्या.’सायेब शासनानी आमच्यासाठी आणलेली ही योजना लई झकास हाय.आता आम्ही लिहू शकतो,वाचू शकतो.आमच्या कामाच्या मजुरीचा हिसोब करू शकतो.

आमी गावाले जाताना गावाच्या नावाच्या पाट्या वाचू शकतो.हे सर्व या पुस्तकाची कमाल हाय. अक्षरधारा पुस्तक आमच्यासाठी’सोन्याचे पुस्तक’हाय.आता आमचा सायेब आत्मईश्वास वाढला.आता आमाले जगाची ओयख झाली.अन् सर्वात महत्वाच म्हणजे आमच्या लेकराईचे आम्ही योग्य जीवन घडवू शकते. सायेब विद्येशिवाय जीवन अधुरं हाय. हो कौसल्याबाई जीवनात खुप प्रगती करा.सर्वजण आपण साक्षर झालात,आपले अभिनंदन.म्हणतात ना,’विद्या परम दैवतम्.

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे