0
4
8
2
9
0
वेडे मन
उगाच का झुरते
नसलेल्या प्रीतीला स्मरते
का स्वप्न युगात जगते
मन वेडे हुरहुरते
का उगाच कलिकांना
हळूच कुरवाळते
वाटे मधूस्पर्श प्रियाचा
मनोमनी सुखावते
घालते गवसणी नभी
येता आनंदे भरते
राहून तारांगणी उभी
एकेक तारका मोजते
हळुवार शीत झुळूक
स्पर्शते मुखचंद्रमा
वाटे आगमन प्रियाचे
धरी अवतरली प्रियतमा
हे सुखही नसे थोडके
होऊन बिलगतो वारा
खट्याळ चुंबता कर्णफुले
हृदयी सळसळती गारा
सविता धमगाये
नागपूर
======
0
4
8
2
9
0



