Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनबीडमराठवाडासाहित्यगंध

गुंतवणूक

शारदा जोशी कुलकर्णी ता. गेवराई, जि.बीड

0 5 1 7 7 2

गुंतवणूक

शब्दांचीच केली गुंतवणूक
तिथे न होणार फसवणूक
होई कधी करमणूक
तर कधी हसवणूक

शब्दांची बँक नी
शब्दांचच खातं
निर्व्याजपणे शब्दांवर
व्याज देतं

कधी असतं जास्त
तर कधी असतं कमी
पण मिळेल मात्र नक्की
याची असते हमी

शब्दांवरच तर मिळतं
इथेही कर्ज
करावा ही लागत नाही
कोणाकडे अर्ज

ना जामीनदार
ना साक्षीदार
आपणच तिथे तालेवर
जगणं होत बहारदार

शारदा जोशी कुलकर्णी
ता. गेवराई, जि.बीड 
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 7 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे