0
4
8
2
9
0
हरवलेली मैत्री
दिवस ते सुंदर होते
हात मैत्रीचे हाती घेतले
सोबतीला छान क्षण
विश्वासाचे धागे गुंफले
अडचण काही असल्यावर
मित्र सोबती असायचे
कोडं कितीही अवघड असो
न सुटलेले नसायचे
शाळा झाली काॅलेज झाले
यशस्वी इमारत घडवली
वेगवान या जीवन प्रवासात
मैत्री मात्र हरवली
व्यस्त जीवनात वेळ काढून
क्षणभर भेटतात मित्र
आठवणीने हृदयी उमटे
हरवलेले क्षणोक्षणी चित्र
दिवस ते पून्हा येतील
हात नव्याने हाती घेतील
एकमेकांत गुंतून जातील
नव्याने नवे नाते जुळतील
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,भंडारा
========
0
4
8
2
9
0



