Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबई

विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रसेविका समितीचे सघोष पथसंचलन

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रसेविका समितीचे सघोष पथसंचलन

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे.(दि.7 ऑक्टो) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्र सेवा समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी विजयादशमी उत्सवा निमित्त घोष पथसंचलनास आरंभ झाला.

कार्यक्रमात सुरूवातीला शस्त्रपूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. पथ संचलनाच्या शोभायात्रेत अग्रभागी दंडगण, त्यामागे खुल्या जीपमध्ये भगवा ध्वज, घोषगण आणि त्यामागे गणवेशातील सेविका अशी शोभायात्रेची रचना होती. कर्वे नगर परिसरातील नागरी वसाहतींमधून पायी पथसंचलनात संपूर्ण गणवेशधारी अशा एकूण साडेपाचशे सेविका सहभागी झाल्या होत्या. यात सर्व वयोगटातील महिलांमध्ये बाल आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती.

महिलांचे एकंदरीत तीन घोष होते. यामध्ये वंशी / वेणु दल ( बासरी), आनकदल (साईडड्रम) तालवाद्य झल्लरी( सिंबल), त्रिभुज (ट्रॅन्गल) आणि पणव (बेस ड्रम) यांचा समावेश होता. अतिशय शिस्तबद्ध आणि सुंदर अशा या पथसंचलनाचे नागरिकांनी जागोजागी चौकाचौकात उपस्थित राहून अतिशय उत्साहाने स्वागत केले. भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या,ध्वजाचे औक्षण, फुलांची उधळण आणि देशभक्तीपर गाणी अशा जल्लोषात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्ष वेधून घेणारा ठरला. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानात संचलनाचा समारोप झाला.

समारोप प्रसंगी राष्ट्रसेविका समिती, संभाजीभाग, कार्यवाहिका अनघा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा. पूनम शर्मा, प. महाराष्ट्र प्रांताच्या शैलाताई देशपांडे,अर्चनाताई चांदोरकर यांच्यासह महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख व संभाजी भाग कार्यकारिणीच्या सर्व सदस्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. शहरातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांनी घोष पथसंचलन सेविकांचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे