ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये आर्थिक साक्षरतेचे धडे.
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये आर्थिक साक्षरतेचे धडे.
“आर्थिक साक्षरता ही काळाची गरज” श्री.ओंकार परब यांचे प्रतिपादन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: दि.२८ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:३० वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज आणि CASI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील यांच्या अनुमतीने लॅा कॅालेमध्ये आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य सौ.नीलम हजारे यांनी कर्यक्रमाचे प्रास्ताविक केले.आर्थिक सल्लागार श्री.ओंकार परब यांनी आर्थिक गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना,प्रत्येक कुटुंबाने शेअर बाजारातील आर्थिक गुंतवणुक या संदर्भात चर्चा करणे आवश्यक आहे असा सल्ला दिला.विद्यार्थ्यांना Securities and Exchange Board of India (SEBI)या मंडळाची कार्ये आणि जबाबदार-या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आणि आर्थिक नियोजनावर पावर पॅाईन्ट सादरीकरण करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना मुच्युअल फंडस्, आणि एस.आय.पी. या प्रकारच्या गुंतूवणूकीवर मार्गदर्शन करण्यात आले.शेअर गुंतवणूकीचे फायदे आणि तोटे तसेच सावधगरीने आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
आर्थिक गुतंवणूक करताना कोणत्या पध्दतीने संशोधन करावे तसेच DMAT अकाउंट कसे हाताळावे आणि कोणत्या सावधगिरी बाळगाव्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.GST, ETF, FD, Insurance, Crypto गूंतवणूक या संज्ञांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.या कार्यक्रमाचे लॅा कॅालेजमधील आय.क्यु.ए.सी.आणि विद्यार्थी आणि शिक्षक कल्याण समितीमार्फत नॅक समन्वयक प्रा.निलम म्हात्रे, प्रा.पियुषा पाटील आणि प्रा.चिन्मय राणे यांनी आयोजन केले.



