0
4
8
2
9
0
वाळूच्या भिंती
स्मरती मला अजूनी
त्या धुंद चांदराती
ती बेहोशी अंगांगी
हात तुझा मम हाती
स्वप्ने किती विणली
आपल्या संसाराची
वाळूत निर्मिलेल्या
याद त्या घरकुलाची
अजूनी मज आठवती
ओल्या हळव्या शपथा
तुझ्या माझ्या प्रीतीची
चांदण्या वदती गं कथा
संशयाची एक लाट
अशी अनावर आली
वाळूच्या भिंती सह
घरकुला घेऊन गेली
आता वेगळ्या वाटा
आणि वेगळ्या दिशा
परी मनास जाळीती
त्या धुंद बावऱ्या निशा
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
0



