‘रायबा ईमानदार’ चित्रपटाचे लेखक व अभिनेत्री यांचा ‘उमरेड’ येथे सत्कार
आमदार संजय मेश्राम व प्रमोद घरडे यांच्या हस्ते लेखक सचिन घोडे व अभिनेत्री प्रणाली राऊत यांचा सत्कार
‘रायबा ईमानदार’ चित्रपटाचे लेखक व अभिनेत्री यांचा ‘उमरेड’ येथे सत्कार
आमदार संजय मेश्राम व प्रमोद घरडे यांच्या हस्ते लेखक सचिन घोडे व अभिनेत्री प्रणाली राऊत यांचा सत्कार
‘लोकमत सखी व सोबती’ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचे आयोजन
तालुका प्रतिनिधी, उमरेड
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर / उमरेड (दि ६): “लोकमत सखी ” तथा “सोबती” ( मानव सेवा प्रतिष्ठान, उमरेड) यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात ‘रायबा ईमानदार’ या चित्रपटाच्या यशस्वी आणि प्रेरणादायी उपक्रमाकरिता
चित्रपटाचे निर्माते व लेखक सचिन घोडे तसेच अभिनेत्री प्रणाली राऊत यांचा उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम आणि समाजसेवक प्रमोद घरडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लोकमत सखी व “सोबती” तर्फे स्वर्गीय संध्याताई खानोरकर स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमही उत्साहात पार पडला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना ‘रायबा ईमानदार’ टीम व मुख्य प्रायोजक ए.के ज्वेलर्सचे विकास खानोरकर, लोकमत सखीच्या मान्यवर असिस्टंट मॅनेजर नेहा जोशी, निर्मिक संस्थेच्या अध्यक्षा जया ताई आंभोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या संपूर्ण सत्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री प्रणाली राऊत, पत्रकार अभय लांजेवार, उमरेड तालुक्याच्या सखी संयोजिका संगीताताई लांजेवार आणि त्यांची संपूर्ण आयोजन समितीचे सभासद उपस्थित होते.



