
0
5
9
4
1
4
देवबाप्पा
देवबाप्पा देवबाप्पा
कुठाय तुझं गाव
सांग ना रे मला
तुझ्या गावाचं नाव
तुझ्या परसदारी
चाॅकलेटचं झाड
चिंगीसाठी तू
थोडे तरी पाड
तुझ्या दारावर
आईस्क्रीमचे तुरे
मॅंगो अन् फ्रुटीचे
वाहतात का रे झरे ?
तुझ्या गावी तर
मजाच मजा
मी तर खाऊचा
उडवीन फज्जा
एकदातरी चिंगीला
दाखव तुझं गाव
नैवेद्य दाखवीन
पेढा एक पाव
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
0
5
9
4
1
4



