0
4
8
2
9
0
दिस सोन्याचे
फाटलेल्या संसाराचा
असे तूच पाठीराखा
हतबल या जीवाचा
सोन्या जीवलग सखा
चार घास पोटासाठी
भाकरीचा मी भुकेला
परवड या पोशिंद्याची
सर्ज्या धाऊन तू आला
घातलीस पुरी उमेद
काबाडकष्ट बहू केले
सोन्या तुजमुळे आज
दिस सोन्याचे हे आले
तूच सखा बंधू रे माझा
नाही अंतर कधी देणार
कृतज्ञता मनात तुजप्रती
ओवी कर्तृत्वाची गाणार
तुझ्या पाऊलाने बरकत
समृद्धी नांदते मज घरी
आला सण बैलपोळ्याचा
देतो उत्सव मनाला उभारी
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
============
0
4
8
2
9
0



