Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सांजवेळ..

सौ.प्रज्ञा सवदत्ती

0 4 8 2 8 6

सांजवेळ..

ती सांजवेळ नि घरचा पकडलेला रस्ता
सोबतीला आठवणींचा तो पसारा
केशरी छटांची लेऊन चादर काहीशी
मनात शोधत होते मी तुझाच आसरा..

आकाशात उडणारी चिमणपाखरे
परतीला काहीसे दिसले आसूसलेले
घरट्यात पिल्लांची असेल चिवचिवाट
त्या ओढीने त्यांचे पंख जणू पसरलेले..

क्षितिजावर भास्कर काहीसा पिवळसर
परत जाण्याचे त्याचे दिसलेले संकेत
उद्याची प्रभा परत आणेन हि आशा
नविन दिवसाची सुरुवात हेच अभिप्रेत..

सांजवेळची ती हसरी जरा लाजरी संध्या
मनात तुझ्या भेटीची साद का घालते माझ्या
हातात हात तुझा घेऊन ती पाऊलवाट
आवडेल मलाही सोबतीने चालणे तुझ्या..

सौ.प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव -रायगड.
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे