Breaking
ई-पेपरगुन्हेगारीनागपूरविदर्भ

नागपूर-उमरेड मार्गावर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

४.१४ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

0 5 1 8 0 3

नागपूर-उमरेड मार्गावर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

४.१४ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २६) नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १२.६८ किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख १४ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२४ फेब्रुवारी रोजी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Narcotics Team) गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूर-उमरेड मार्गावरून गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत गस्त वाढवली.

दरम्यान, लाल रंगाची मोठी बॅग घेऊन क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून जाणारा एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्प पाठलागानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश युवराज पांचबई (वय ३०, रा. पिंपळगाव निपाणी, ता. पातूर, जि. भंडारा) असे आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील लाल बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १२.६८ किलो गांजा आढळून आला. चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा वितरणासाठी नेत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे. यात १२.६८ किलो गांजा (किंमत अंदाजे २४,१३,६००) वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी एक मोबाईल फोन, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २४,१४,६०० इतकी आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम २० (ब) व २२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून या अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे