Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*????संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा????*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*

*????स्पर्धेचा विषय : रानशाळा????*
*????मंगळवार : ०३ /डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*रानशाळा*

रानातील शाळेला नसतात चार भिंती
चांगल्या विचाराचे आदान-प्रदान होते शाळेभोवती |

रानातील शाळेला नसते जारमधील पाणी
मुले शाळेतील गातात शुद्ध झऱ्याची गाणी |

रानातील शाळेला नसते वही पेनची गरज
निसर्गाच्या शाळेमधून मुले होतात तरबेज |

चिंच, बोरे, आंबा, फणस, करवंद आवडीने खातात
रानातल्या शाळेमध्ये फळे मोफत मिळतात |

कांदा, मुळा, भाजी, भाकर होतात लगेच हजर
रानातील शाळेमध्ये मिळतो पोषक आहार |

रानातील शाळेमध्ये होतो मातृभाषेचा वापर
आहे आम्हा सर्वांना रानशाळेचा आदर |

*श्री पोपट सुखदेव मस्के*
*भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा*

एकदा रानात भरली
प्राण्यांची रानशाळा
जोरात चर्चा झाली सुरू
आणला काळा फळा ॥१॥

चिवचिव आली चिमणी
आला कावकाव कावळा
विठूविठू पोपट व मैनाराणी
शुभ्र बगळा,जमला गोतावळा ॥२॥

भित्रे ससोबा आले
रान मित्रांचे स्वागत झाले
कोल्होबानी उद्घाटन केले
सर्वांचे कौतुक झाले ॥३॥

माकडोजी आले उड्या मारत
ससोबा लागले शिकवू
मित्रांनो रानभाज्या फळ खा
आले तिकडून अस्वल भाऊ ॥४॥

शाळेचे हेडमास्तर हत्ती
म्हणे खा भोपळा कारल
कंदमुळ,येईल शक्ती
मधून एकदा प्यावे एरंडेल ॥५॥

ऐकून सारे झाले पसार
प्राणी त्रासले,नको ती शाळा
हत्तीदादा गेले हलत डुलत
बंद पडली रानची रानशाळा ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा

चला पाहू या रानशाळा
आपण मिळून रे सारे
नाही भेदाभेद रे बाळा
सभोवती वाहतात वारे

रानशाळेतील पाहा झरा
स्वछंद वाहतोय रे खरा
मनात कसला नाही मळ
आनंदाने वाहे खळखळ

झाडे, वेली, पशु नि पक्षी
गाणी गातात रे आनंदाची
नभांगणाची आहे साक्षी
कोण तृणभक्षी, नरभक्षी

नाही इथं काही भरवसा
तरी नसे सुखाला दुष्काळ
उड्या मारत फिरतो ससा
कधी कुणाचा अंतिम काळ

रानशाळा खरी वास्तविक
जगण्या शिकवी सुवासिक
जरी असले रे बहुभाषिक
जीवन जगतात लवचिक

फिरून या रे रानशाळेतून
तण सारे काढून मनातून
सूर्य चमके जसा ढगातून
निरोप घ्या असा जगातून

निरोप घ्या असा जगातून

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*रानशाळा*

जंगलाच्या शेजारी सुंदर तळे
उमलली त्यात कमळाची फुले

बेडूक रावांची मजाच भारी
डराव डराव चला शाळेची वेळ झाली

वडाच्या झाडाखाली भरली शाळा
उशीर होईल चला सारे पळा

उंच उंच डोंगरावर खारूताई राहते
शनिवारची कवायत शिट्टी वाजवून घेते

ससेभाऊ ससेभाऊ उगी नका भिऊ
गणिताच्या तासाला बघून मनीमाऊ

भटजी बनून आले बगळे दादा
मराठी व्याकरणावर त्यांचा ताबा

मुंगीताई आली एक दोन तीन
रांगेत कोण नाही त्याला चावा घेईन

कोकिळा बाईंनी गायनाचा तास घेतला
राग समजून घ्या नीट मोराने धाक टाकला

पाहून सारे पक्षी प्राणी फुलला मळा
रोज रोजच भरत असते अशी रानशाळा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा*

गर्द वनराईत भरली
पशु पक्षांची शाळा,
लावीला वृक्ष वेलींना
तिने मायेचा लळा.

चिवचिवाट करून सारे
घेई डोईवर, रानशाळा,
फुलला त्या आवाजाने
शेतकऱ्यांचा पानमळा.

बगळे कावळे कबुतर
पाणी प्यायला,आले,
हर्षित झाली धरणी माय
पाहू लागली प्रिय बाळे.

पक्षाची कडक शिस्त
नाही त्यात दिरंगाई,
वटवृक्षगुरुजी घेई हजेरी
गैरहजरास शिक्षा होई.

रोज सांज सकाळी भेटायचे
हिशोब ठेवायचा असतो,
सर्वांच्या येण्याजाण्यावर
बारीक नजर तेवत असतो.

वृक्ष वेली झाडे तरु
पशुपक्षी आणि प्राणी,
अभ्यासक्रमाची पुस्तके
कोकिळा गाते मंजुळ गाणी.

रानाच्या माळावर
भरते रोजच शाळा,
अनुभवाच्या साठी
निसर्ग आहे, फळा,

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा*

पाखरांची रानशाळा रंगली
पाखरेही सारी शाळेत दंगली

सुरू चिमण्यांचा चिवचिवाट
फांदीवर बसून घोळका दाट

राघू मैना बुडाच्या खोकाडात
गुलू गुलु जणू बोले आपसात

पिसारा फुलवूनी रानावनात
थुई थुई नाचतोय मोर बनात

बगळे उडती मुक्त आकाशात
शुभ्र कमानी उभारल्या त्यात

झाडांवर कावळा काव काव
सांगतोया माणसा झाडे लाव

झाडावर विविध पक्षी बसून
घेतात धडे ते नवे नवे शिकून

खळखळ वाहे झऱ्याचे पाणी
पक्षी ही गातात मंजुळ गाणी

निसर्ग गुरूच लावतोय लळा
भरतेया पशुपाखरांची शाळा

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा*

रानशाळा माझी आहे सुंदर
त्यात वाहते पाटाचे पाणी झरझर..
मासे शिकवती पोहणे आम्हांस
पाण्यात इकडेतिकडे पळती भरभर..

आंबा रानात आहे भला मोठा
त्याला जरी दगड मारला..
तरीही तो देतो गोड गोड फळ
परोपकार शिकवतो तो आम्हांला..

झाडावर बसले पोपट किती
मिरची खातात बोलतात गोड..
करतात नक्कल बोलणाऱ्याची
रट्टमपट्टी करू नका मोडा खोड..

नीळे, जांभळे, पिवळे,हिरवे,लाल
मोराचा पिसारा की रंगांची कमान..
मोरा कडून घ्यावे चित्रकलेचे ज्ञान
थुई थुई नाचला की हरपते भान…

मास्तर म्हणाले आवडले का वर्ग
ना पुस्तकं,ना दप्तर,ना गणवेश,ना फळा…
तरीही अभ्यास कसा छान झाला
निसर्गासम वाटे आनंदी ही रानशाळा.

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*रानशाळा*

आज भरवली आम्ही रानशाळा
ठिकाण होते रानात आंब्याचा मळा…१

सरसर सगळे झाडांवर चढू
मित्रांसाठी छान कैऱ्या काढू….२

मुलांनो आज पिकांना लावा लळा
रानपाखरांशीही आज भरपूर खेळा…३

सगळ्या पिकांची ओळख करून घ्या
भरपूर आनंद तुमच्या हृदयी भरून न्या..४

नकोच जेवण आज रानमेवा खाऊ
झाडावेलींचीही ओळख करून घेऊ ..५

रानशाळेत जरा फुलांशीही खेळू
मऊ मऊ गवतावर मनसोक्त लोळू…६

बळीराजाशीही दोन शब्द बोलू या
मुक्या प्राण्यांनाही थोडीशी वैरण घालू या…७

रानशाळेतही अभ्यासाशिवाय खूप मजा केली
जीवन जगण्याची कला सहज शिकता आली…८

कधीतरी अशी भरवावीच रानशाळा
रोज रोज नको वाटते भिंतींची शाळा…९

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे