0
4
8
2
8
7
बाई
नवरा गेला घरात तिची परवड झाली
नाजुक होती बाई आता कणखर झाली
राब राबतो आई तेव्हा घरात चंगळ होते
नवीन वारे घरात शिरता..तिची अडगळ झाली.
नदी सारखी वाहत राहते …पोटात घेते सारे
सुपीक झाली जमीन भोवती तिची …वणवण झाली.
काय करावे कसे करावे उमजेना..उगाच जगले
खट्ट होता जरा कुठे तर….चमकण झाली.
सिंधू बोदेल रामटेक
नागपूर.
===========
0
4
8
2
8
7



