सेवानिवृत्त शिक्षक ‘वासुदेव खोंडे’ यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
रजत डेकाटे उमरेड/भिवापूर
सेवानिवृत्त शिक्षक ‘वासुदेव खोंडे’ यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
रजत डेकाटे उमरेड/भिवापूर
नागपूर (दि १० नोव्हे.): भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उखळी येथे कार्यरत असलेले शिक्षक वासुदेव खोंडे हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उमरेड येथील हॉटेल डी मर्सी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला पाहमीचे केंद्रप्रमुख प्रशांत टेंभुर्णे, भिवापूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर मते, सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव डाखरे, पदवीधर सेवानिवृत्त शिक्षक शामराव डोये, पंचायत समिती भिवापूरचे विस्तार अधिकारी रुग्वेद भांडारकर, कुही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक बांते, अरुण देशपांडे सर्वोदय आश्रम नागपूर या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
मान्यवरांनी सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव खोंडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. मित्र परिवाराच्या वतीने वासुदेव खोंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी ३३ वर्षे २ महिने असे योगदान दिले. त्यांनी या ३३ वर्षात अनेक असे विद्यार्थी घडविले. त्यांनी शाळेत आपल्या पत्नीच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव खोंडे यांच्या विषयावर अहवाल वाचन शेषकुमार मेश्राम यांनी केले. याच सोहळ्याला बहारदार करण्यासाठी शिक्षिका सरला सातपुते यांनी कवितेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमेश्वरी सातपुते (खोंडे) यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला सातपुते यांनी यांनी केले तर आभार प्रमोद खोंडे यांनी मानले. हा सेवापूर्ती सत्कार सोहळा यशस्वी करण्याकरिता नरेंद्र गजभिये, नरेंद्र घिमे शिक्षक व मित्र परिवारांनी आयोजन केले. यावेळी पियुष खोंडे, मिलिंद सातपुते, दुर्गाशंकर, विजयानंद सावळे, विजया डाखरे, शिला रोडे, कल्पना भोंगाडे मित्रपरिवार व नातेसंबंधी आदींची उपस्थिती होती.



