
0
5
7
8
9
8
वैष्णवांचा मेळा
वैष्णवांचा मेळा । जमला पंढरी ।
उभा विटेवरी । पांडुरंग ॥१॥
चिपळ्या मृदुंग । टाळ तालावर ।
नामाचा गजर । माऊलीचा ॥२॥
झेलते विश्वाला । पंढरीची वारी ।
संकटात तारी । भक्तगणां ॥३॥
मिळे समाधान । चंद्रभागा काठी ।
भक्ती भाव गाठी । भक्तांसाठी ॥४॥
भक्तांवरी जीव । विठ्ठल मायाळु ।
मनाने दयाळु । विठुराया ॥५॥
अंतरात वास । वसे चराचरी ।
विठोबा श्रीहरी । अंतरात्मा ॥६॥
भक्ता मनी राही । विठ्ठुच अखंड ।
नाही कधी खंड । हृदयात ॥७॥
शांती मना देई । भाबड स्वरूप ।
साधभोळ रूप । गुणवान ॥८॥
माऊली दर्शना । येती सारे गण ।
तोच त्यांचा सण l विठुवारी ॥९॥
भक्तीरस मनी । भक्तीचिया कास ।
लागलिया आस । नीलाचिया ॥१०॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो
0
5
7
8
9
8



