0
4
8
2
9
0
माझी पाककला
रागी उत्तप्पा
साहित्य: एक वाटी दही, दोन वाट्या रागीचे पीठ, एक वाटी तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, एक चिरलेल़ा कांदा, एक चिरलेला टोमॅटो, चिरलेली सिमला व साधी मिरची अर्धी वाटी, चिमुटभर खायचा सोडा, तेल,मीठ इत्यादी.
कृती: तांदूळ व डाळ भिजत घाला. पाच, सहा तासांनी मिक्सरला फिरवून घ्या. त्यात रागीचे पीठ मिसळून वरील सर्व जिन्नस अर्धे घाला. अर्धे वरून घाला..पाणी घालून पातळसर भिजवा.नाॅनस्टीक तव्यावर उत्तप्पा बनवून घ्या. गरमागरम खायला द्या. रागी उत्तप्पा.
वाढप: ही रेसीपी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर, यवतमाळ
=======
0
4
8
2
9
0



