गदारोळ
घरोघरी विधान भवनी चालते गदारोळ।
इथे तिथे रस्त्यावर मग होई जाळपोळ।।
लोकशाही बिचारी म्हणे , वागू कशी काय।
संविधानच तारेल दुजा नाही तरणोपाय।।
खून खराबी दंगली रोजच कसे काय होते।
दुष्कर्मी वाटताना दिसती सदा पैशाचे पोते।।
निव्वळ भ्रष्टाचारी करतात रोज रोज वाद।
एकाच माळेचे मणी ,कधी होत नाही बाद।।
महागाईचे आज कोणीच ईथे बोलत नाही।
स्वार्थ साधल्याविना कोणी कांदे सोलत नाही।।
देतात आश्वासने भरपूर भर चौकात आम्हा।
खोटारडे दाखले देऊन दावी औकात आम्हा।।
राजकारण म्हणजे घोटाळ्यात घोळ आहे।
उपमा काय देऊ तया ,मधमाशीचा पोळ आहे।।
डंक यांचा असतोच खूप तुला मला विषारी ।
पण मधापायी आपण सारेच होतो लाचारी।।
गरीबी बेकारी आता या मातीत जिरत आहे।
सुशिक्षित पदवीधर बिनकामी फिरत आहे।।
गंभीर प्रश्नावर कधीही करत नाही चर्चा।
असे पापी गंगेत न्हाऊन करतात पुजाअर्चा।।
जीवन जगावे आचरण करून तथागताचे।
पंचशीला अष्टांगानेच भले होईल जीवनाचे।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा. जि यवतमाळ
========



