0
4
8
2
9
0
माझी पाककला
बीटरूट तिखी
साहित्य: दोन वाट्या कणिक, एक वाटी रवा, एक वाटी चना डाळीचे पीठ, दोन वाट्या बीटाचा कीस, एक चमचा ओवा, थोडी हिरवी मिरची लसूण पेस्ट, एक चमचा धने जि-याची पूड, मीठ, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती: कणीक, रवा, बीटाचा कीस, वरील सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा. छोट्या पु-या लाटून तेलात तळून घ्याव्या. गरमागरम तयार खाण्यास आपली बीटरूट तिखी.
टीप- बीटाचा कीस एकदम न घालता थोडाथोडा घालावा. बसत नसेल तर शिल्लक ठेवा.
मीनाक्षी काटकर
जि.यवतमाळ
===========
0
4
8
2
9
0



