Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

भावसार चौकातील कठडे कायमस्वरूपी हटवावे

सिमेंटचे डिवाइडर बसवून रस्ता बंद करण्याची पालकांची जोरदार मागणी

0 5 1 7 8 8

भावसार चौकातील कठडे कायमस्वरूपी हटवावे

सिमेंटचे डिवाइडर बसवून रस्ता बंद करण्याची पालकांची जोरदार मागणी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि २७) शहरातील सी ए रोड येथील गांधीबाग मेन रोड वरील भावसार चौकात गेल्या काही दिवसांमध्ये शाळकरी विद्यार्थांचा अपघातात मोठी वाढ झाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळी ९ ते ९ः३० या दरम्यान रस्त्यावर क्रॉस करणाऱ्यांची वाहतूक कोंडी व प्रचंड गर्दी राहते. भावसार चौकातून रस्ता क्रास करतांना इंडिया संन हॉटेल समोर वाहतूक पोलिसांनी लावलेले लोखंडी बॅरिकेड्स अपघातांचे कारण ठरले आहे.

रस्त्याने जाणारे दुचाकी वाहने बॅरिकेड्स ला अडकून अपघात होत असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. गांधीबाग मेन मार्गावरील इंडिया सन हॉटेल समोर जे महाराष्ट्र पोलीसचे बॅरिकेड्स (कठडे) लागलेले आहे. ते हटविण्यात यावे. अशी मागणी शाळकरी विद्यार्थांचा पालकांनी केली आहे.

कारण डाव्या साईडला नक्षत्र बिल्डिंगच्या मागे शाळा आहे. तिथून विद्यार्थी निघतात आणि रोड क्रॉस करतात त्यामुळे अपघात होतात तो रस्ता कायमचा बंद करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.. येता-जाता विद्यार्थ्यांचा अपघात होऊ शकतो. आणि ये-जा करणारे रस्त्यांवर पायदळ चालणाऱ्यां नागरीकांचाही अपघात होऊ शकतो. त्यासाठी (महाराष्ट्र पोलीस चे कठडे) मधातच लावलेले कायमस्वरूपी कठडे हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनपा प्रशासनाला केली आहे.

वाहतूक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पालक आंदोलन करेल. असा इशारा पालक, सामाजिक संघटनानी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे