Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

पात्र-अपात्र

बी एस गायकवाड पालम,परभणी

0 4 8 2 9 3

पात्र-अपात्र

फक्त शिक्षकांना ठरवा पात्र अपात्र
बाकी हा नियम तुम्हाला नाही मात्र

डी.एड,बी.एड अभ्यासक्रम करून
शिकवण्याची हातोटी अंगिकारून

दिल्या निवड मंडळाच्या ही परीक्षा
मुलाखतीतून निवडी झाल्या तशा

बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणे
काळानुसार स्वीकारलीत आव्हाने

ऑनलाईन,ऑफलाईन कामे करतो
आपले ज्ञान नेहमी अद्यावत ठेवतो

गुरुजी आमचा कशात मागे नाही
चोख पार पाडतो दिलेली कामे ही

निवडणूक, जनगणना असो काही
गुरुजी शिवाय पानही हालत नाही

टीईटी घेणार म्हणे याच गुरुजींची
पात्र अपात्र परीक्षा शुद्ध सोन्याची

घ्याव्या लोकप्रतिनिधीच्या परीक्षा
पात्र अपात्रतेच्या सर्वांच्या परीक्षा

बी एस गायकवाड
पालम,परभणी
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे