
0
4
8
2
8
4
वसंतोत्सव
मधुगंधी मधुमासाच्या
इथे तिथे या चाहुली
रंग वसंताचे लेऊनी
पुलकित धरा रंगली
गंधभरी सुखद अशी
वात लहर ही आली
क्षितीजासी ओठंगुनी
आभा पूर्वेच्या गं गाली
सृजनाचीआस अशी
ठायी ठायी जागलेली
खग विहगा अंतरात
मीलनाच्या या चाहुली
मदभऱ्या मधुमासी हा
वासंतोत्सव सोहळा
गंधभरे रंग उधळूनी
वसंत किती नादावला
गंधित या वसंत रंगी
सखे रंगून तू ये ना
राधिके तुझ्या मिठीत
एकरूप हा कान्हा
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
8
4



