बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी केले. स्नेहसंमेलन अध्यक्ष अजित नाईक सर यांनी स्नेहसंमेलनच्या अहवालाचे वाचन केले.
त्यानंतर मराठी भाषा गौरवदिना निमित्तानं आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा, विद्यार्थी दिन, क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवक म्हणून उत्कृष्टरीत्या काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष जयंत चेऊलकर, खजिनदार सुवर्ण कांबळी, सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे, उपसेक्रेटरी त्र्यंबक पाठक, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा शालेय समिती विद्यमान सभासद मोरेश्वर म्हसकर, धोकवडे केंदाचे केंद्रप्रमुख उमेश ठाकूर सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्नेहसंमेलन अध्यक्ष अजित नाईक सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष धनराज फड सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे खजिनदार सुवर्ण कांबळी व शालेय समिती सभासद मोरेश्वर म्हसकर यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर व आभार प्रदर्शन आशिष राणे सर यांनी केले. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमा नंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.



