
0
4
8
2
9
7
नैराश्य
तुझ्याविना प्रत्येक क्षण
वेदनेचा हुंकार वाटतो
आठवणींचा काळोख
जेव्हा मनामध्ये दाटतो
येता नैराश्य मन होते शुन्य
दिवसही मग रात्रच भासते
तू यावा पुढे संपावा अंधार
देवाजवळ हेच तर मागते
फिरते तुझ्या भोवती वेड मन
क्षणोक्षणी होते तुझी आठवण
व्याकुळत मन माझ कधी कधी
जीवनात कुठे उरतो मग शीण
आज जरी नैराश्य आयुष्यात
आस उद्याच्या सोनेरी क्षणाची
लाटा मनाच्या होतीलच शांत
घडेल जेव्हा भेट माझ्या सख्याची
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
7



