Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : ये रे घना..!!🌤️*
*🔹गुरूवार : २६ / ०६ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १७५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ये रे घना*

*गरजत बरसत*
*ये रे घना*॥
*कर बहारदार*
*या रुक्ष जीवना*

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना….!*

ये रे घना…ये रे घना
धरणी माईकडे बघना जरा
खूप झाला सोसाट्याचा वारा
आनंदाने बरस होऊन धारा

*अश्विनी आनंदराव जगदाळे*
*ता.केज जि. बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे ना*

ये रे घना या निरभ्र आसमंती
स्वागतास तव आसुसली धरती
जलधारांचे दान तु मुक्तहस्त देता
दाटेल हरित चैतन्य चराचरांवरती

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

जळतंय शेत माझं कधीचं
भेगाळलेली वसुंधरा
ये रे घना वाट पाहते
सोसवेना दाह उरा

*सविता धमगाये नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ये रे घना*

हिरवं सपान फुलविण्यास नि
कृष्णरंग सांडण्यास ये रे घना
नको करू सजीवसृष्टीची तू
जीवघेण्या दुष्काळाने रे दैना

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

तुझ्या विरहात रिती माझी ओंजळ
ये रे घना ये रिचव प्रीतीचं दान
तुझ्या वर्षावात भिजू दे माझं तनमन
एकरूपतेत फुलू दे क्षण नं क्षण

*सौ.तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

ये रे घना बरसून ये
चिंब पावसात न्हाऊ दे
काळाकुट्ट ढग झुले आभाळ
धुऊन जावू दे मनावरच जाळ

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

ये रे घना ये बरसत
सजीव सृष्टी जावू दे बहरुन
धरणी माता हिरवा शालू नेसून
नद्या नाले वाहू देत भरून

*सौ .लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना…!*

ये ना रे ये रे घना…!
नको छळू इतकं मना
बरसून एवढ तृप्त कर
धरेस विरहकळा सोसवे ना…!

*सौ.भावना अजय इटकीकर अकोला*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

काळ्या काळ्या ढगातून
ये रे घना ये ना लवकर रे
बळीराजा माझा बघतो वाट
शिवार त्याच हिरवं कर ना रे

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना….*!

काळ्याकुट्ट ढगांनी दाटले आभाळ
हिरव्यागर्द शालूचा धरणीला भार
हात मेघांचा फिरला डोंगरमाथ्यावर
ओसांडून ये रे घना…एकाकी माळरानावर

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*येरे घना येरे घना*

येरे घना येरे घना
बरस धुव्वाधार
चिंब चिंब कर मना
वंदन तुला त्रिवार

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*…!

आशेने केली पेरणी
फिरवू नको पाठ,
ये रे घना,बरसत
नको, दुबार घाट.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना*

ये रे घना ये रे घना
पाऊस पाड रानावना
बहरू दे झाडे वेली
आनंदू दे सार्‍या मना

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿
*ये रे घना…!*

ये रे घना चिंब भिजून जाऊ दे
सखे साजणी सोबत आनंद लुटू दे
शेतकरी राजाची चिंता दूर होऊ दे
मनासारखे पिक हाती येऊ दे

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌤️🌨️🌤️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे