स्वरगंगा गाने… तराने…!
अनिता व्यवहारे
स्वरगंगा गाने… तराने…!
भारत पुत्र मनोज कुमार यांना भावपूर्ण आदरांजली..!
“मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती”
कृषीप्रधान संस्कृती असलेला आपला भारत देश आणि मातीतून सोनं पिकवणारी ही धरती माता. क्षशीलतेचा वसा घेऊन सर्वव्यापक अशा या वसुंधरे प्रती आपण सर्व भारतवासीय नेहमीच नतमस्तक असतो. अशा या भारत भूमी विषयी मनोज कुमार ज्यांना भारत पुत्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी काढलेला ‘उपकार’ हा सिनेमा 1967 साली प्रदर्शित झाला. देशप्रेमाने ओत प्रोत भरलेल्या या सिनेमातील सर्वच गीत संगीत, संवाद आणि अभिनय,, कथानक…. यातून या धरतीची आणि संस्कृतीचीच ओळख होते. सर्वच बाबी अगदी हृदयात घर करून राहतील अशाच आहे.त्यामुळे अनेक पारितोषिकांनी पुरस्कृत असा हा सिनेमा.. यातील अजरामर गीत लिहिणारे गीतकार मनोजकुमार आणि त्याला संगीतबद्ध करणारे प्रख्यात संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यामुळे हे गीतचं नव्हे तर संपूर्ण सिनेमा प्रेक्षकांच्या अगदीच पसंतीस उतरले आहेत.
‘मेरे देश की धरती’ हे शब्द ज्येष्ठ गायक ‘महेंद्र कपूर’ यांनी आपल्या आवाजातून ‘अमृतमय’ करून टाकले आहे. हा सिनेमा काढताना त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने प्रेरित होऊन हा चित्रपट काढला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय म्हणजे सर्वव्यापी ‘वन एन्ड ओनली’ मनोज कुमार….!! नुकतेच या भारत पुत्राचा स्वर्गवास झाला…!
‘मेरे देश की धरती’ या गाण्याच्या रसग्रहणातून त्यांना भावपूर्ण आदरांजली. या भारत भूमीवर असलेल्या शेतकऱ्यांचे दैवत असलेले बैल… शेतात राबू लागतात त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज जणू
बैलों के गले मे जब घुंगरू जीवन का राग सुनाते है
जीवन गीत व्यक्त करतात.. तेव्हा त्यांच्या त्या मंजुळ आवाजात, ‘गम को सो दूर हो जाता है! खुशियों के कवल मुस्काते है!’ म्हणजे, दुःख दूर पळून आनंदाची फुलं फुलू लागतात.
‘सुन के रहट की आवाज यु लगे कई शहनाई बजे’!
क्यू न पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है!
अशा या धरतीवर जेव्हा आपण विराजमान झालेला असतो त्यावेळी तर असं वाटतं की जणू या आवाजाने शेतात ही शित लहरी नव्या नवरी प्रमाणे सजतात. आणि
‘जब चलते है इस धरती पे हल ममता अंगडाई या लेती है’! जीवनाचा आनंद देणाऱ्या आणि ममत्व देणाऱ्या इथल्या मातीचा प्रत्येक जण पूजा करणार यात नवल नाही.
जो या भूमीत, या मातीत जन्मला त्या प्रत्येकाला ही माती प्रेम देते.
यहाँ अपना पराया कोई नही है
सब पे मा उपकार तेरा
इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा
अशी ही आपली धरती म्हणूनच तिचे सर्वांवर न फेडता येणारे उपकार आहेत आणि हेच उपकार मनोज कुमार नव्हे त्यांची खरी ओळख भारत कुमार आहे त्यांच्या या शब्दातून मांडतात ते इथे फक्त देश प्रेमच व्यक्त करत नाही तर शेतकऱ्यांचे योगदान आणि एकतेच्या, महत्त्वाची जाणीव सुद्धा त्यातून व्यक्त होते.
ये बाग हे गौतम, नानक का
खिलते है अमन के फूल यहाँ
इथे जन्मलेल्या या जनतेतून महात्मा, गांधी सुभाष चंद्र, रविंद्र नाथ टागोर, लो. टिळक असे शांततेचे दूत जन्माला आले.
रंग हरा हरी सिंग नलवे से रंग लाल है बहादुर से
रंग बना बसंती भगतसिंग रंग अमन का वीर जवाहर से
या ओळीतून तर हरिसिंग नलवा या पराक्रमी सेनापतीने अनेक युद्ध जिंकून शीख साम्राज्याचे रक्षण करून शौर्याचे प्रतीक असलेला हिरवा रंग, लाल रंगातून धैर्याचं प्रतीक आणि बलिदान असलेले बहादूर म्हणजे शूरवीर
हे कसे या मातीतजन्मले आणि
‘रंग बना बसंती भगतसिंग रंग अमन का वीर जवाहर’, या ओळीतून तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अमन म्हणजे शांतीचे आणि तत्वज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यातून व्यक्त होणारा पांढरा रंग… भारतीय ध्वजातील रंगांच्या प्रतिकातून या धरतीचे गौरव गाण व्यक्त केले आहे.या गीताला आपण ऐकावे, अनुभवावे आनंद घ्यावा..
अशी अनमोल गाणी ऐकली तर नक्कीच देशातील प्रत्येक नागरिकाला देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि ‘मेरे देश की धरती.. मेरा प्यार ही उसकी संपत्ती..!’ अशी भावना व्यक्त होईल आणि तिचं…. ‘मनोज कुमार या भारत पुत्रासाठी भावपूर्ण श्रद्धांजली’ होईल .यासाठी तरी
नक्की ऐका….!
आणि मग तुम्हाला जाणवेल..
Old is Gold..!
देशभक्ती इज अनमोल…!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर



