Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

स्री शिक्षणाचे प्रणेते : महात्मा ज्योतिबा फुले

आशा सुभाष गेडाम

0 4 8 2 9 0

स्री शिक्षणाचे प्रणेते : महात्मा ज्योतिबा फुले

आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा समाजामध्ये सामाजिक दास्यत्वाची…मानसिक, शारिरीक विषमतेची आणखी एक गुलामगिरी अस्तित्वात होती. स्पृश्यास्पृश्यता हा भेदभाव समाजामध्ये पाय घट्ट रोवून उभा होता, अज्ञानाचा तिमिर बहुजनांच्या आयुष्याला पोखरत होता अशात समाजातील उपेक्षित स्री वर्गाला नवसंजीवनी देण्यासाठी एका क्रांतिसूर्याचा उगम झाला. त्यांच्या अटल ध्येयवादी कृतीशील विचारांनी वर्चस्ववादाने पिचलेल्या समाजाला शाश्वत परिवर्तनाची नवी दिशा दाखविली. मुलींच्या शिक्षणासाठी आद्य क्रांती करणारे , उपेक्षित, वंचित, शोषित समाजासाठी आयुष्य वेचणारे, बहुजन उद्धारक महामानव महात्मा ज्योतिबा फुले.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात…

विद्येविना मती गेली|
मतीविना नीती गेली|
नीतीविना गती गेली|
गतीविना वित्त गेले|
वित्ताविना शुद्र खचले|
इतके अनर्थ एका अविद्येने केले||

सदरील ओळी शिक्षणाचं अफाट महात्म्य सांगत, मौलिक संदेश देवून जातात. बहुजन समाजातील अज्ञान, दारिद्र्य, समाजातील जातीभेद पाहून, महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक परीस्थिती बदलण्याचा निश्चय केला. उज्वल भविष्यासाठी व समाजाला शाश्वत आदर्शाची नवी दिशा देण्यासाठी स्रियांनी शिक्षित होणं गरजेचे आहे हे त्या काळात महात्मा फुले यांनी ओळखलं होतं. महात्मा फुले यांनी आपल्या काही विश्वासू मित्रांच्या मदतीने पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 मध्ये मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळातील समाज नियमांना डावलून, प्रवाहाविरुद्ध केलेली ही भविष्यवेधी क्रांती होती. महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वत: घरीच शिक्षित करून, मुलींच्या शाळेत मुलींना शिकविण्यासाठी तयार केले व सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या भारतीय महिला शिक्षिका म्हणून मुलींना शिक्षित करू लागल्या.

ज्योतिबा आणि सावित्री कर्मठ समाजाच्या प्रचंड द्वेषाला व रोषाला सामोरे जात मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झिजले. म. फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी उचललेले एक क्रांतीकारी पाऊल आज प्रगतोन्नत होऊन, दशदिशांत झळकतांना दिसतेय. पण…पण गुलामगिरी अजूनही संपलेली नाही. मुलींनो संस्कार मुल्ये जपत, सर्वसमावेशक शिक्षण घेतांना स्व:अस्तित्वाची खंबीरता अंगी बाणणं… मुरवणं… आज अत्यंत गरजेचे झालेले आहे. सामाजिक, आर्थिक, व्यवहारिक, शारिरीक, मानसिक, भावनिक अधिनस्त होवून, कुणी हुंडाबळी जाऊ नये, कोणाची स्री भ्रुण हत्या होवू नये, कोणाचे चारित्र्य हनन होवू नये, कामाच्या ठिकाणी कोण्या स्रीचं मानसिक खच्चीकरण होवू नये,कुणी शिक्षणाचा गैरवापर करून एखाद्याला फसवू नये… कोणावर अन्याय करू नये तर कुणी श्रद्धा वालकरही होवू नये. महात्मा जोतिबा फुलेंनी संघर्षात्मक, त्यागमय जीवनज्योतून निर्मिलेली स्री शिक्षणाची ज्वाला विकारांचा, अपयशाचा, अधोगतीचा विद्वंस करणारी कायम चेतक प्रेरणा बनून राहावी. समस्त स्री वर्गाला महात्मा जोतिबा फुलेंनी देलेली शिक्षण ही सर्वोच्च देणं केवळ बिरूदावली न ऊरता स्व:विकास साधत, समाज कल्याण साधणारी ठरावी.

आशा सुभाष गेडाम( सहा. शिक्षिका)
वणी जि.यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे