0
4
8
2
9
4
कवीमन
कवीमन असते सदा
कल्पनेत गुंतलेला
शब्दांचे काढून अर्थ
पूर्णत्वास नेते कवीतेला
कवीमन शांत शितल
असतो सुस्वभावी कोमल
नसतो मनात कटुता
प्रेमभाव असतो अनुकूल
कवीमन शोधतो विविधता
शोधतो शब्दांचे भांडार
निसर्गाच्या असतो सानिध्यात
पशुपक्षांच्या सहवासात
कवीमनाला कोणी कां,,
समजू शकत असतो,,
भावभावनांमध्ये जातो रमून
सारे जगच सुंदर दिसतो
जंगल पहाड नदी नाले
नयनरम्य मनोहारीक निसर्ग
फुल फुलांच्या सुगंधात रमून
शोधत असतो स्वर्ग
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
=====
0
4
8
2
9
4



