चाळीसगाव तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत जि.प.प्रा.कन्या शाळा कळमडूचे सुयश
गजश्री पाटील
चाळीसगाव तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत
जि.प.प्रा.कन्या शाळा कळमडूचे सुयश
जि.प.प्रा.कन्या शाळा कळमडू, केंद्र -खेडगाव ता.चाळीसगाव, जि.जळगाव येथे समृद्धी शिक्षक फाउंडेशनतर्फे आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत ‘बालिका दिन’ व ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी चित्र काढून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ 14 जानेवारी मकर संक्रांतीला झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, विशेष अतिथी म्हणून आमदार मा.मंगेश दादा चव्हाण, समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संस्थापक सचिव दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत अनुष्का सोनवणे, भानुश्री सोनवणे, भूमिका सोनवणे, आराध्या महाले, पुष्कर्षा सोनवणे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. संगीता सोनवणे मॅडम, वर्गशिक्षक श्रीमती गजश्री पाटील, व सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन करून कौतुक केले.
शब्दांकन: गजश्री पाटील



