Breaking
ई-पेपरकविताबीडसाहित्यगंध

कशाला उद्याची वाट

राजश्री मिसाळ ढाकणे बीड

0 4 8 2 9 7

कशाला उद्याची वाट

कशाला उद्याची वाट वेड्या
क्षण आजचा सोडून पाहतो
क्षणभंगूर आहे जीवन तुझे रे
भविष्याची का ओझी वाहतो..!!

घडायचे जे जे जीवनी तुझ्या
एक दिवस आकस्मात घडते
डोंगराएवढे दुःख कोसळून
काळीज आतल्या आत रडते…!!

दिवस आजचा तुझ्या हाती
पुन्हा कधीच ना परतून येतो
येणारा उद्या कसा असेल ते
अचूक भाकित कोण सांगतो…?

किरायाचा देह आहे तुजला
आत्मा तुजला सोडून जातो
तू कमावलेला पैसा संपत्ती
दुसरा आयता उपभोग घेतो…!!

दुर्लभ आहे जन्म मानवाचा
ध्यानी घेऊन सत्कार्य करतो
देश समाजासाठी जगणारा
किर्तीरूपाने कायम स्मरतो…!!

राजश्री मिसाळ ढाकणे बीड
==========

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे