
0
4
0
9
0
3
मशागत
मशागत जमिनीची
करू लागला कृषक,
मृगसरी येण्याआधी
व्हावी जमिन निपोक..!!१!!
पेरण्याची उत्सुकता
मन घेतेय भरारी,
स्वप्न सजवले मनी
पीक येईल बहारी..!!२!!
वखरण,नांगरण
झालं उत्तम जोमात,
दिसे धरा काळीशार
येई कृषक हर्षात..!!३!!
मजुरांना मिळे काम
लगबग झाली सुरू,
येता पाऊस मृगाचा
सुरू पेरणी करू…!!४!!
पावसाच्या नक्षत्रांची
झाली आता सुरूवात,
मृगछाया ही पडली
सर्व लागले कामात…!!५!!
श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
=======
0
4
0
9
0
3





