
0
3
4
5
8
2
प्रतिकार
काळ तू बलवान जरी
मीही नसेच बलक्षीण,
किती घाव घालशील
असाय बघून पक्षीण…!!१!!
प्रतिकार करण्यासाठी
कंबर कसून तयार मी,
कर कितीही वार आता
मानणार नाही हार मी….!!२!!
तुला व ताकत पणाला
कर कितीही परेशान,
पराजित होणार नाही
जपेन माझा स्वाभिमान…!!३!!
बाहुलेच समजून मला
खेळवण्याचा डाव तुझा,
टाकेन तुजवर प्रतीडाव
शब्द तुलाही हाच माझा…!!४!!
संधी तुलाच देत आले
याचाच घेतला गैरफायदा,
आता पलटवार करेन मी
हाच तुला करते वायदा…!!५!!
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
======
0
3
4
5
8
2