0
4
8
2
9
4
पवित्र बंधन
भाऊ माझा पाठीराखा
नित्य करी बहिणीचे रक्षण
असा सण रक्षाबंधनाचा
नित्य घेऊन येईल श्रावण
भावा बहिणीची माया
रक्षाबंधनाची काया
साद घालता भावाला
आज दिनी मिळे छाया
नातं बहीण भावाचं
पवित्र बंधन रक्षाबंधन
भावाला राखी बांधून
घट्ट होतं प्रेमाचं बंधन
रक्षाबंधनाचा सण मोठा
नाही आनंद उत्सवाला तोटा
बहिण भावाचे हे नातं
प्रेमळ, विश्वास,वाटा
येते भावाला आठवण
बालपणात जाते मन
आहे राखीचं ग बंधन
करूया प्रेमाने औक्षण
एक धागा विश्वासाचा
जास्तच घट्ट प्रेमधागे
संसार रुपी वेलीवर
मिसळते वहिनी भावासंगे
सण आला रक्षाबंधनाचा
धाग्याची विण घट्ट प्रेमांनी
धागा बांधून औक्षण
करूया नंदादीप ओवाळूनी
कुसुम पाटील कसबा बावडा
कोल्हापूर
========
0
4
8
2
9
4



