Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

कर्मचारी महासंघटना व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 4 1 0 0

कर्मचारी महासंघटना व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर: (दि २०) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ही एक स्वायत्त संस्था असून सन 1965 च्या कायद्यातील तरतूदीनुसार सदर कार्यालयातील कर्मचा-यांसाठी बढती/बदलीकरिता स्वतंत्र धोरण आहे. सन 1993 च्या कार्यकारी परिषदेतील ठरावानुसार त्याची अंमलबजावणी होत आहे. कालानुरुप सन 2005, 2017 व 2020 अन्वये बढती/बदली निकषांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली.

मात्र दि. 12/02/20206 रोजीच्या ठरावानुसार मंडळ प्रशासनाने सदर बढती-बदली धोरण आकस्मिक रद्द केले आहे. याबाबत कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता, चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळ कर्मचाऱ्यांचे अहित होणार असून कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे.

सदर कर्मचारी विरोधी ठराव रद्द करुन सन 2017 व 2020 च्या कार्यकारी परिषदेने मंजुर केलेले. बढती / बदली धोरण कायम ठेवण्यात यावे. याकरिता मंडळातील कर्मचारी महासंघटना, पुणे व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे यांच्या कृति समिती द्वारे दि. 26/03/2026 रोजीच्या पत्रान्वये विनंती केली आहे. तथापि मंडळ प्रशासनाने त्याची दखल घेतील नाही. त्यामुळे पुनःश्च संयुक्त कृति समितीने दि. 15/ 04/ 2026 रोजीच्या पत्राद्वारे विनंती केली आहे. सुलभ संदर्भाकरिता सदर पत्राची छायाप्रत जोडण्यात आली आहे.

याउपरही मंडळ प्रशासनाद्वारे बढती-बदली धोरणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतला गेल्यास / चर्चेस न बोलविल्यास कर्मचाऱ्यांना मंडळ प्रशासन आंदोलन करणेस भाग पाडीत आहे अशी धारणा आहे. सदर आंदोलनामुळे सन 2026 चे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे