0
4
8
2
8
6
अहंकार
आता तरी मानसा रे
अहंकाराला तू सोड
माणसा सारखे वाग
सर्वांनाच बोल गोड.
धरू नको मोह आता
संपत्तीचा जीवनात
नातीगोती सोयऱ्यांना
वेळ दयावा आनंदात.
करू नको हेवेदावे
असे प्रेम देत जावे
सर्वांच्या चेहऱ्यावर
गाली हास्य ते दिसावे.
तुझे दिवस आले रे
करू नको अपमान
वेळ कशी ती येईल
याची ठेवा मनी जाण.
गर्व करू नये कुणी
क्षणभंगुर जीवन
प्रेम आपुलकी स्नेह
असावे निर्मळ मन.
दीपककुमार सरदार
ता. लोणार, जिल्हा बुलढाणा
======
0
4
8
2
8
6



