अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव वार्षिक सभेत मंजूर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव वार्षिक सभेत मंजूर
आता सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असे नाव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि २२) : अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावात सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असा
बदल करण्याचा ठराव आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षि सर्वसाधारण शनिवारी (दि. 22) पी. एन. पी . नाट्यगृह चेंढरे येथे आयोजित करण्यात आली. आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतखाली ही सभा घेण्यात आली. या सभेत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावत बदल करून पतसंस्थेचे नाव सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड असे करण्याचा ठराव संचालक अॅड. आत्माराम काटकर यांनी या सभेत मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यावळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट करून या ठरावाचे स्वागत केले.
आदर्श पतसंस्थेच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील शाखेसाठी व पुणे – वारजे येथील शाखेसाठी जागा खरेदी करण्याचा ठराव देेखाली या सभेतच मंजूर करण्यात आला.
आदर्शचे 58 हजार 886 सभासद आहेत. 596 कोटी 88 लाख ठेवी आहेत. 460 कोटी 73 लाख रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकत्रीत व्यवसाय 1057 कोटी 61 लाख रूपये आहे. ढोबळ नफा 15 कोटी 41 लाख रूपये झाला आहे. 37 टक्क्यांनी ठेवी वाढल्या आहेत. 45 टक्क्यांनी कर्ज वाढ झाली आहे. आदर्शची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, अशी माहिती अदर्शचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.
मागील एका वर्षात ३०४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला . अशी कामगिरी करणारी राज्यातील पहिली संस्था होण्याचा मान आदर्शला मिळाला . यंदाच्या वर्षात १५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय तर पुढील दोन वर्षात २५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचा मानस आहे, असे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
सभेपूर्वी सभासदांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. आदर्श पतसंस्थेचे सल्लागार नितीन वाणी यांनी सभासद बँकिंग संदर्भात मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
आदर्श पतसंस्थेचे संस्थापक व संचालक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक सतीश प्रधान, अॅड. आत्मारम काटकर, विलाप सरतांडेल, अॅड. रेश्मा पाटील, अॅड. वर्षा शेठ, भगवार वेटकोळी, महेश चव्हण, श्रीकांत ओसवाल, श्रीमती सुचित्रा दिवाण, योगेश विरकुड, तज्ज्ञ संचालक संजय राऊत, डॉ.मकरंद आठवले, कार्यलक्षी संचालिका सौ. मीनाक्षी पाटील या सभेला उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वार्षिक सभेच्या वेळी देशासाठी शहीद झालेला वीर सुयोग याची पत्नी निशा सुयोग कांबळे हिला 51000 चेक देण्यात आला तसेच कौस्तुभ मेहुल पाटील फायटर पायलेट याचे सत्कार करण्यात आला व प्रदीप ताम्हाणे शास्त्रज्ञ व कर्मचारी आदर्श पतसंस्था यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व शेवटी डॉ.मकरंद आठवले यांनी आभार मानले.
आदर्श नावाच्या अनेक पतसंस्था महाराष्ट्रात आहेत. या पतसंस्थांबाबत बातम्या आल्या की आमच्या सभासदांमध्ये गैरसमज होतो. काही छत्रपती संभाजी नगगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतंस्था अडचणीत असल्याची बातीमी प्रसिध्द झाली. त्यात आमच्या पतसंस्थेच्या इमारतीचा फोटा व माहिती वापरण्यात आली होती. वारंवार असे प्रकार होत राहीले तर सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होत राही. ते टाळण्यासाठी आम्ही आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच नाव बदलून ते सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड करण्याचा निर्णय घेताला आहे.
अभिजीत सुरेश पाटील
अध्यक्ष, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था



