
0
5
9
0
3
7
काऊदादा
काऊदादा काऊदादा
तुमचा रंग का हो काळा
बाबा म्हणतात तुम्हाला
एकच आहे डोळा
रोज रोज साबणाने
आंघोळ तुम्ही करा
रंग होईल तुमचा
गोरा गोरा गोरा
दिवसभर तुमची
असते धावाधाव
पक्ष्यांच्या पिलांवर
मारत असता ताव
‘जगा आणि जगू द्या’
तुम्हाला कळत नाही
बाळ माझं नेलं म्हणून
रडते चिऊताई
आजी म्हणते घाणेरडा
आहे तो काऊ
चिंगी नाही मागणार
तुझ्या जवळ खाऊ
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
==========
0
5
9
0
3
7



