Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकृषीवार्तानागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : पाऊस दाटलेला📘*
*🔸मंगळवार : ०५ / ०८ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पाऊस दाटलेला*

काळ्या ढगात
पाऊस दाटलेला
भिजवतो ओहोळ
उन्हाने आटलेला

घेतो मी अंगावर
पावसाच्या सरी
खोकला सर्दी ताप
होईल मला जरी

नको जावू अंगणात
पाऊस दाटलेला
आई ओरडते घरातून
तोवर मी निसटलेला

बाबा आले ऑफिस मधून
आईने केली तकरार
विचार नाही केला त्यांनी
अन मला पडला मार

रडलो मी धाय मोकलून
डोळ्यात अश्रू दाटलेले
वर आभाळात पाहतो
तर दिसे ढग फाटलेले

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

काळेकुट्ट ढग भरलेले नभात,
पाऊस दाटलेला दिसे ढगात..!

खूप पाऊस पडणार वाटते,
आकाशी ढगांची गर्दी दाटते..!

ढगांचा गडगड आवाज झाला,
सो सो करीत वारा ही आला..!

पावसाची सर सरसर धावता,
चींब झालो पावसात भिजता..!

अंगणात गारांचा सडा पडला,
गारा खाण्याचा आनंद लुटला..!

आई म्हणे आता सर्दी होईल,
शाळेला दांडी मारली जाईल..!

घाबरु नको मी आहे हट्टाकट्टा,
शाळा बुडवणार नाही हा पट्टा..!

रात्रीला आला सणसणून ताप,
आता झाला ताप,बाप रे बाप..!

तसाच दप्तर पाठीवर घेतलो,
शाळेच्या वाटेने चालू लागलो..!

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

काळ्याकुट्ट अंधाराचे, काळे कपडे घालून
बागुलबुवा आला, माझ्या कडे धावून
लकलकतो प्रकाश, हसतो गडाडून
दात दाखवितो, कडकड कडाडून

सांगितले होते आईने, बाहेर जावू नको
दूर टेकडीमागून, बागूलबुवा येतो
दिसता मी बाहेर, वर वर चढला
सगळीकडे काळा काळा, अंधार पडला

जागेवर बसलो, हातपाय गळाले
बागुलबुवाने मला, होते का धरले
खाईल का आता तो, मला चावून चावून
हात लांब करत आलाय, कसा तो धावून

भयानक रूप त्याचे, गेलो मी घाबरून
रडे माझे ऐकून, बाबा आले धावून
थरथरत्या पायाने, चालायला येईना
घर कुठे माझे, मला काही दिसेना

जवळ येताच बाबा, घट्ट मिठी मारली
भितीने होती माझी ,घाबरगुंडी उडाली
सांगितले बाबाला, त्याला तुम्ही हाकला
धरा काठी देतो ,मारा त्या बागुलबुवाला

ऐकून सारी कथा, बाबा मोठ्याने हसले
आम्ही मात्र घाबरून, कोपऱ्यात बसले
बाबा म्हणाले बाळ, नभी पाऊस दाटलेला
पाण्याच्या ओझ्याने, आहे तो वाकलेला

चल आपण दोघे, पावसात जावू
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, खेळून येवू
बागुलबुवाची मग आता, पळून गेली भीती
भिजत असतो मनसोक्त, पाऊस असो किती

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पाऊस दाटलेला*

निरभ्र नभाशी पाऊस दाटलेला
सोसाट्याचा वारा तो सुटला..१

क्षणात झाले काळेकाळे सारे
वाहू लागले ते थंडगार वारे..२

धो धो धो धो पाऊस कोसळतो
त्यात विजांचा कडकडाट होतो…३

गारांचा अंगणी थर साचला
धावत गेलो अन थर वेचायला…४

चमचम करी जणू मोतीदाणे
गारांनी भरली तुडुंब अंगणे…५

धुव्वादार सुरू पावसाची धार
भिजलो झेलून पावसाचा मार..६

निघालो शाळेत मारत उड्या
उशीर झाला मग खाल्ल्या छड्या..६

रोज पड पावसा माझ्या दारी
पाण्यात खेळायची मजा भारी…७

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

निळ्या निळ्या नभात
काळ्या काळया ढगात
दिसतो पाऊस दाटलेला
दिसे ढगात मामा लपलेला

रंगीबिरंगी पाखरे
मायेची आहेत लेकरे
दिसतात उडतांना नभात
विजांच्या लख लाख प्रकाशात

पाऊस दाटलेला पाहून
आम्ही थोडा थबकलो
जोरात विजांच्या कड कडाट
आम्ही खूपच दचकलो

बाप रे बाप,काय आवाज जोरात
तवा मोर नाचत होता रानात
हरणांचा तो कळप बघता
होता जोरात सुटला पळत

प्रत्येकाला होती भीती मनात
आम्ही सारे मुले रानात
आई बाबांना भीती आमची
आम्ही घाई केली घरी जाण्याची

हळू हळू पडू लागला अंधार
पडू लागली पाण्याची धार
घाबरलो आम्ही सारे मुले
झालो आम्ही बेजार

ही सहल होती मुळी
आमची भावना होती खुळी
निसर्ग हा सगा सोबती
बरं झालं ,ओढवली नाही आपत्ती

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

मित्र आले बोलवायला
आई जाऊ दे ना खेळायला / धृ/

पाऊस दाटलेला
बरी नाही वेळ
खेळ खाऊ देते बाळा
घरातच खेळ.

काळे काळे ढग
डोंगरावरून आले रांगत
येणार आता पाऊस बाळा
वारा आला सांगत .

आभाळ आले भरून
विजांचा चमचमाट.
ढगांचा गडगडाट बाळा
नको खेळाचा थाट.

टप टप पडती गारा
आजारी पडशील बाळा
भिजून होशील ओला
बुडेल मग शाळा.

आजीने सोडले फर्मान
खेळू दे त्याला पावसात
अल्लड ते बालपण
दुखवू नको बालमन.

*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

निरभ्र आकाश काळे झाले
वाटे पाऊस दाटलेला ढगात
सर्वत्र पडला क्षणात अंधार
चंद्रही दिसेना नभांगणात

वाजांचा लपंडाव सुरू झाला
वाराही वेगाने वाहू लागला
धावपळ झाली स्वजीवांची
पक्षी झाडाचा आश्रय घेतला

धरणीला लागलीय ओढ
चिंबचिंब भिजण्याची
मेघराज बरसून जा धो धो
मुलांनाही हाऊस खेळण्याची

आभाळ फाटल रित झालं
भरले तुडूंब ओहळ, नदी,नाले
पाण्यात सोडून कागदी बोट खेळू
बेभान नाचू लागली पावसात मुले

सरीवर सरी आल्या वादळही आले
घसरला पाय अमन खाली पडला
उचलायला गेले शरद, मिनी, राणी
चिखलाने माखला खुप खुप रडला

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला (बालकाव्य)*

टम्म टम्म फुगला होता
ढग तो काळा काळाशार
हलता येईना चालताना
दम लागला हो फार फार…

डोंगरावरून जाता जाता
अचानक वारा भेटलेला
ऊबदार मिठीत वाऱ्याच्या
वितळला पाऊस दाटलेला…

खाली येताच केले स्वागत
बोलला बेडूक डराव डराव
पोटभर पाणी प्याले पक्षी
कावळा गायला कावकाव…

उंदीरमामाच्या बिळात पाणी
इकडे तिकडे सुरु धावाधाव
चाहूल न लागता सावकाश
मनीमाऊने साधलाच डाव…

जिकडे तिकडे पाणीच पाणी
अंगणात शर्यत मुलांची नाव
नदी ओहोळ तुडुंब भरलेले
झाला आनंदित सारा गाव…

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

पाऊस दाटलेला ढगात
उधाण आले नभात.
काळया काळया ढगांनी
गर्दी केली आकाशात.

पाऊस आता पडेल
ओले चिंब करेल.
पावसाला बघूनच
आता सुट्टी मिळेल.

वाट किती पहावी
चिंब चिंब करायची.
चिंब ओले होऊनच
घरी पळत जायची.

वाटे पाऊस रुसलाय
कुठे तरी फसलाय.
दाटलेला पाऊसच.
ढगात अडून बसलाय.

पावसा रे नको रुसू
आता तरी लवकर ये .
नको मला सुट्टी बुट्टी
पण सर्वांना पाणी दे.

खूप खूप झाडे लावेल
रोज मी काळजी घेइल.
मग तर तू येशील ना.
धो धो बरसशील ना.

*प्राजक्ता खांडेकर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सुगत नगर नागपूर*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️
*पाऊस दाटलेला*

काळे काळे ढग
गार गार वारा
तनुवर चढला
काटेदार शहरा….

पाऊस दाटलेला
नभात लपलेला
छानदार मोराचा
पिसारा फुललेला…

ढग गडगडले
ढोल वाजू लागले
पावसाच्या सरींनी
अंगण चिंब झाले…

रंगीत संगीत पक्षी
घरटी परत आले
आपल्या पिलांना
घास भरवू लागले…

रमा चालली शाळेला
वीणा तिच्या साथीला
उड्या मारत चालल्या
राजू पण आहे मदतीला…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🔰🌨️♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे