
0
5
1
6
5
1
नारीशक्तीचा विजय
आकाशी घेतलीस तू , उंच विहंग भरारी।
प्रेरणा सामर्थ्य दिशा ,आदिशक्ती आहे नारी।।
रुपी जिजाऊ सावित्री ,ती रमाई लक्ष्मीबाई।
जगी जननी म्हणूनी, नीतिमूल्यांची मुक्ताई।।
वात्सल्य प्रेम ममता, तुझे गाऊ किती गूण।
आकार मिळे जीवना ,सुसंस्काराला जपून।।
अबला झाली सबला ,नारी शक्तीचा विजय।
संविधान बा भीमाचे , केले सर्वांना निर्भय।।
तुझे भूषण लेकरा ,तुझा त्याग आशीर्वाद।
ओवाळीतो ह्रदयाने,गोवर्धन घाली साद।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि,यवतमाळ
0
5
1
6
5
1



