Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशसाहित्यगंध

दिलखुलास

संध्या मनोज पाटील अंकलेश्वर, गुजरात

0 5 1 6 5 2

दिलखुलास

कसे जगावे दिलखुलास सांगा कोणी मला..
या व्यवहारी दुनियेत नाही,जमले रमणे मला..
या जीवन वाटेवर,कितीदा घावच मिळाले
पूर्वजन्मांचे संचित असे वाढले देवाने मला..

अपेक्षांच्या कटघऱ्यात नेहमी उभे रहाणे आले
स्वप्नातही कुणाला इथे दुखवावे ना वाटले मला..
आई -वडिलांचे संस्कार जणू नडत आले मला
म्हणूनी जशास तसे वागणे कधी ना जमले मला..

अबोलपणाचा फायदा घेताना दिसली दुनिया
ज्याचा त्याचा देवधर्म, तो बघतो प्रत्येकाला..
खरे खोटे करणे नाही, एवढेच उमगले मला..
मी मात्र अध्यात्ममार्गी, गुरुतत्व समजले मला..

मौनातली शक्ती अनंत,तीच खंबीर बनवते मला..
नवीन कर्मात पडणे नाही,हा जीवनमंत्र झाला..
आजमावतो जरी तो ईश्वर,तोच आवडतो मला..
दिलखुलास करते भक्ती,त्यात नाही लाज मला..

आत्मसंगतीत हरवून जाता, मज मिळतो आनंद
दलबदलू चढूवून मुखवटा,जगणे ना जमले मला..
जरी कितीदा दिले नैराश्य माझ्या देवानेही
चरणी बोलावण्याचे त्याचे, कळले बहाणे मला..

मडक्याला घडविण्याची अदभुत त्याची ही कला..
दिलखुलास घाव सोसणे आता जमू लागले मला..
एकाच जन्मी संपवू सारे देणे घेणे चला…
दिलखुलास तो परमात्माही तारून घेतो मला..!
दिलखुलास तो परमात्माही तारून घेतो मला..!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे