Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे १२ वीत घवघवीत यश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 5 6 4 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे १२ वीत घवघवीत यश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग/रायगड: (दि ८ मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च – २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र [ इ. १२ वी ] परीक्षेचा अॉनलाईन निकाल शनिवार दि. २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासने घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये कला शाखेमधून परीक्षेला बसलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल ८४ % लागला आहे. तसेच वाणिज्य शाखेमधून परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल १०० % लागला आहे. कला आणि वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.७२% लागला आहे.

कला आणि वाणिज्य शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे:

*प्रथम क्रमांक -* नाखवा शर्वरी रवींद्र – ८६ .०० % [ कला शाखा ]
*द्वितीय क्रमांक -* थळे मुग्धा नयन – ८५. ६७ % [वाणिज्य शाखा ]
*तृतीय क्रमांक-* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र – ७५ .५० % [ कला शाखा ]

कला शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे:

*प्रथम क्रमांक-* नाखवा शर्वरी रवींद्र- ८६ .०० %
*द्वितीय क्रमांक -* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र – ७५.५० %
*तृतीय क्रमांक -* मोरे श्रावणी देवजी — ६९. ८३ %

वाणिज्य शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे:

*प्रथम क्रमांक -* थळे मुग्धा नयन – ८५.६७ %
*द्वितीय क्रमांक -* गावंड धैर्या पुरुषोत्तम – ७५. ३३ %
*तृतीय क्रमांक -* दरीडगे वेदांती राजेश – ७४.५० %

या उत्कृष्ट निकालाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक या सर्वांचे आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद तसेच ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 6 4 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे