शब्दमाळ
आपल्याच मातृभाषेमध्ये बोलताना आपण अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. मोकळेपणाने बोलताना आपला विश्वास,आपल्या भावना,आपले विचार अगदी नेमकेपणाने आपण सांगू शकतो. मनातल्या भावना आणि मनातले शब्द रिकामे करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. ती म्हणजे आपली मातृभाषा. मग मातृभाषा मराठी असू दे, इंग्लिश असू दे,हिंदी असू दे, तमिळ असू दे,कोणतीही असू दे… मन मोकळं करायला शब्द लागतातच. भावना व्यक्त करायला शब्द हवेतच. आपली मातृभाषा ही मराठी भाषा आहे. मराठीत आपण शब्द माळ तयार करूया.
तर शब्द माळ म्हणजे काय? शब्दमाळ म्हणजे एखादा विषय घेऊन त्यातील शब्द चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावणे. दररोजच्या गोष्टींबद्दल आपल्याला तरे तऱ्हेचे अनेक शब्द माहीत असतात. उदाहरणार्थ आपण दिवस असा घेतला तर, ढग आले, आभाळ भरून आलं,अंधारून आलय, उजाडले,लख्ख ऊन,,ऊन, रण रणतंय, पाऊस ,गार, हवा, वातावरण, थंड.. असे काही शब्द की जे अगदी अथपासून,इतीपर्यंत लिहिले जातात. अशाप्रकारे आपण एकच विषय घेऊन अनेक शब्द पट्ट्या, वाक्य पट्ट्या तयार करू शकतो. असे शब्द तयार करून अनेक शब्द माळा बनवू शकतो. आणि याच उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊ शकतो.
उदा- पाऊस हा विषय घेतला तर मुलांना पावसावर आधारित शब्द लिहायला सांगावीत. त्या शब्दांचा योग्य वाक्यात उपयोग करावा. कधी रिकाम्या जागा भरायला द्याव्यात. कधी शब्द जोड्या लावायला द्यावेत. अनेक शब्दासाठी एक शब्द द्यावा. कधी एका शब्दातील उत्तरे घ्यावीत. असा अनेक प्रकारे शब्द मनातून आपल्याला उपक्रम म्हणून घेता येतील. शिवाय प्रश्नपत्रिका काढायलाही सोपे जाईल. अशा प्रकारे आपण इंग्लिश, हिंदी या भाषांचाही उपक्रम घेऊ शकतो. सध्या उपक्रम प्रकल्प याला अनन्य साधारण महत्त्व आहे. मुलांच्या कृतीला वाव आहे. कृतीयुक्त शिक्षणाला महत्त्व आहे. मुलांच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारून मुलांना बोलते करायला लागते. मग अशा उपक्रमातून मुल अधिक छान घडते. शब्दमाळांचा नेहमी उपयोग करावा. शब्दसंग्रह मुलांचा वाढत जातो. त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. हा उपक्रम नक्कीच वर्गात राबवून पहावा.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी पुणे



