Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा इ.१० वी चा निकाल ९७.१४ टक्के

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा इ.१० वी चा निकाल ९७.१४ टक्के

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी – मार्च – २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र [ इ. १० वी ] परीक्षेचा निकाल मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासने घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये विद्यालयातील परीक्षेला बसलेल्या ७० विद्यार्थ्यांपैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.१४ % लागला आहे.
*विद्यालयातील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे –*
*प्रथम क्रमांक -* पुरो कार्तिकी अभय – ८९.४० %
*द्वितीय क्रमांक -* साळुंखे सानिया शंकर – ८८.४०%
*तृतीय क्रमांक-* गावंड अनुज चेतन – ८८.२० %

या उत्कृष्ट निकाला बद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक या सर्वांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे