Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 4 1 0 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग/ रायगड: मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सुनिल मोरे सर व उपस्थित सर्वांनी त्रीशरण – पंचशील म्हटले.

या प्रसंगी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, दत्तात्रय अहिरे सर, आशिष राणे सर यांनी आपल्या भाषणातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी तर आभार प्रदर्शन सचिन भंडारे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे